बहुविध डिजीटल मिडीया

डायनॅमिक व स्टॅटिक अशा दोन प्रकारच्या वेबसाइट्स आहेत. मात्र अनन्या डेव्हलपर नेहमीच डायनॅमिक वेबसाइट्स बनवते. https://bahuvidh.com ही डायनॅमिक वेबसाइट आहे. क्लायंट ही वेबसाइट स्वतः हाताळतो. अनन्या डेव्हलपरने ही वेबसाइट्स द्रुपालच्या साहाय्याने बनवली आहे. याचा उपयोग करूनच त्यांनी विविध प्रकारचे डेटासेट्स तयार केले आहेत. या वेबसाइटचा मुख्य उद्देश म्हणजे उत्तम दर्जाचे लेख व मजकुर वाचकांपर्यंत पोचवणे आणि त्यांचे अनुभव वाढवणे.

या वेबसाइट्स मध्ये माहितीचा भडीमार न करता निवडक लेख समाविष्ट केले आहेत. हे लेख समाजील इतर लोकांना वाचता, ऐकता आणि बघताही येतात. तसेच त्या लेखाबद्दल ते आपले मतही मांडू शकतात. तो लेख कोणी लिहीला आहे, कोणत्या तारेखेला लिहीला गेला आहे हेही समजते. या वेबसाइट्स वरील लेख नेहमी वाचता, बघता यावेत असे जर वाटत असेल तर त्याचे वार्षिक सभासद्त्व घ्या. हे शक्य होत नसल्यास आपले सोशल अकाऊंट या वेबसाइटला जोडून एका दिवसाकरिता सभासद व्हा.