माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

The Directorate General of Information and Public Relations is known to all as the body that coordinates the publicity work of the Government of Maharashtra. Information on various welfare programs, initiatives, policies, schemes and various campaigns of the Government of Maharashtra is disseminated to the public through this system. In addition to conveying the activities of the government to the people, the Directorate General also has to carry out the task of conveying the reaction of the people to the government.

We created the website of the Directorate General of Information and Public Relations using Drupal. This website provides information about the Directorate General of Information and Public Relations, tenure, branches at the headquarters. As this website is dynamic in nature, the staff of the Directorate General handles the website itself. It has various publications, audio-visual aids. It also includes accreditation magazines and schemes provided to the reporter.

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी कार्यक्रम, उपक्रम, धोरणे, योजना आणि विविध मोहिमांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येते. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही महासंचालनालयास पार पाडावी लागते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची वेबसाइट आम्ही द्रुपाल वापरुन बनवली. या वेबसाइट मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची माहिती, कार्यकाळ, मुख्यालयातील शाखा यांविषयक माहिती नमुद केली आहे. ही वेबसाइट डायनॅमिक स्वरुपाची असल्यामुळे महासंचालनालयाचे कर्मचारी ती वेबसाइट स्वतःच हाताळतात. यात वेगवेगळी प्रकाशने, दृकश्राव्ये उपलब्ध करुन दिली आहेत. तसेच पत्रकार जनतेसाठी पुरविल्या जाणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिका, योजना यात समाविष्ट आहेत.