ADHAR Trust

1990 मध्ये श्री. माधव गंगाधर गोरे यांनी सुरुवातीस ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वृद्ध व्यक्तिंची काळजी घेणारी व त्यांची मानसिकता सुधारणारी संस्था स्थापन केली. ते या संस्थेचे संचालक अध्यक्ष आहेत. कालांतराने या संस्थेची शाखा नाशिक मध्ये निर्माण झाली. ही संस्था मतिमंद बालकांसाठी पण काम करते. वृद्ध व्यक्ती व मतिमंद बालके यांच्या संरक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे. या संस्थेच्या 10 ट्रस्टीज पैकी 7 ट्रस्टीज हे मतिमंद बालकांचे पालक आहेत.

या संस्थेची माहिती मिळवण्यासाठी https://adhar.org/ ही वेबसाइट अनन्या डेव्हलपरने द्रुपालच्या मदतीने बनवली आहे. या वेबसाइटमध्ये त्या संस्थेत होणारे उपक्रम, त्या संस्थेची उद्दिष्टे ही सर्व माहिती नमुद आहे. येथे दिल्या जाणाऱ्या सोइसुविधाही त्यात समाविष्ट आहेत. या वेबसाइटमध्ये संस्थेत साजरे  केले जाणारे उत्सव व उपक्रम यांची आकर्षित छायाचित्रे उपलब्ध आहेत. या संस्थेला विविध असोसिएशन्स व इन्सिस्टुट यांनी भेट दिली आहे. संस्थेस देणगी देण्यासाठी ऑनलाइन पर्यायसुद्धा आहे.