Community Poratl means a group of people who interact to each other with the help of social unit. Some companies has their own community portal. This community portal helps to collect specific data about those companies. Company client can work online on their company portal and handled securely. Many governments provides news, live updates to the people by using community portal.

We are highly experienced in community portal based websites using Drupal. We always use latest, updated Drupal core with selective modules and premium themes to customize community experience for you. Client can easily handled this websites & created their own pages. With the help of portal, client can connected to the society & catched information about society. Suppose, if a community portal of a school in a particular area is created, then the teachers and other staff of that school can mention some of the rules and activities related to that school on these portals.

We developed visionraigad.in/ community based website for Raigad District of Maharashtra State for “Support Local” initiative of Hon. PM Narengra Modiji. This portal is wonderful fusion of “Tourism Destinations” & “Local Vendors“. Visitors looking for information about tourism spots in Raigad are automatically presented with vendors and service providers in local area. This creates awesome possibility of availing global platform to local vendor.

कम्युनिटी पोर्टल म्हणजे असे पोर्टल्स ज्यावर काही लोक किंवा लोकांचा समुह एकत्र येऊन काम करतात. अर्थातच ‘सामुदायिक पोर्टल्स’. ज्यांना एकाच प्रकारच्या गोष्टीमध्ये आवड आहे ते लोक ग्रुपने या कम्युनिटी पोर्टल वर काम करतात. कम्युनिटी पोर्टल ही अशी वेबसाइट आहे ज्यावर एका विशिष्ट क्षेत्र, विभाग, स्थान इत्यादींबद्दल माहिती नमुद करता येते. कम्युनिटी पोर्टल्स हे काही कंपनींचे देखील असतात. कंपनींच्या पोर्टल्सवर कंपनींचे क्लायंट ऑनलाइन कामे करू शकतात. हे पोर्टल्स सुरक्षितपणे हाताळता येतात. अनेक सरकार या पोर्टलचा उपयोग करुन आपल्या अद्यतने, बातम्या लोकांपर्यंत पोचवतात. उदा. एका विशिष्ट क्षेत्रातील एका शाळेचे कम्युनिटी पोर्टल तयार केले तर त्या शाळेसंबंधी नियम, उपक्रम अशा काही गोष्टी त्या शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी या पोर्टल्स वर स्वतः नमूद करू शकतात.

आम्ही द्रुपालच्या साहाय्याने कम्युनिटी पोर्टल वर आधारीत काही उत्तम प्रकारच्या वेबसाइट्स बनवल्या आहेत. उदा. marathi.gov.in/, bahuvidh.com/, hindivivek.org/ इत्यादी. या वेबसाइट्स क्लायंट स्वतः सहजपणे हाताळु शकतो. अशा वेबसाइट्स वर क्लायंट स्वतः ची पानेे स्वतः बनवू शकतो. या पोर्टलद्वारे क्लायंट समाजाशी निगडीत राहून काम करु शकतो व समाजातील गोष्टी ज्ञात करुन घेऊ शकतो. तसेच कम्युनिटी पोर्टल्स आकर्षित बनवण्यासाठी द्रुपालच्या आधारे निवडक मोड्युल्स आणि नवनवीन थीम्स वापरतो.

आम्ही श्री. नरेंद्र मोदी यांच्या “सपोर्ट लोकल” या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हयाकरिता कम्युनिटी पोर्टलच्या आधारे visionraigad.in/ ही वेबसाइट बनवली आहे. या वेबसाइट मध्ये पर्यटनविषयक माहितीस्थानिक व्यवसायिकांची माहिती स्वयंचलितरित्या दिसते. तेथे राबविण्यात आलेल्या योजना, प्रकल्प, उत्सव याबद्दलही माहिती ज्ञात करुन घेता येते. तसेच रायगडसंबंधीत बातम्याही बघता येतात. या पोर्टलच्या मदतीने तेथील स्थानिक विक्रेत्यांना एक दर्जेदार प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मोठमोठ्या व्यावसायिकांचे स्वतःच्या व्यवसायांचे स्वतंत्र असे कम्युनिटी पोर्टल्स असतात. यामुळे त्यांच्या व्यवसायांची माहिती आपल्याला लगेचच प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर अनेक व्यावसायिक नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात.