Custom software हे असे सॉफ्टवेअर आहे जे विशिष्ट संस्था किंवा इतर वापरकर्त्यासाठी तयार केले जाते. Custom software बनवण्यासाठी फक्त किंमतीचा विचार करुन चालत नाही, कारण भविष्यात होणाऱ्या सुधारणा, बदलत जाणाऱ्या गरजा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी वापरकर्त्याचा समावेश असतो. हे सॉफ्टवेअर मोठमोठ्या कंपन्यांची किचकट कामे करण्यासाठी वापरले जाते. बांधकाम उद्योगासाठी देखील Custom software उपयुक्त आहे. बांधकाम प्रकल्पात होणारे बदल, प्रगती या सगळ्याची माहिती साठवून ठेवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. तसेच या प्रकल्पातील बांधकाम मालक, डिझाइन टीम, कॉन्ट्रॅक्टर यांच्या विशिष्ट गरजा भागविण्यासाठीही होतो.