After deciding the policy regarding the use of Marathi as the official language, the Language Directorate was established to implement it properly. After that, in order to make maximum use of Marathi language in the state administration, the Language Directorate created various types of Paribhasha Kosh. But since all these definitions were in the form of dictionary print, their actual use was very limited. It took time to have an integrated website.
Ananya MultiTech designed the Marathi Dictionary portal for Language Management in Drupal. On this portal, more than three and a half lakhs Marathi words are available in English and Marathi synonyms under 39 Governing Paribhasha Kosh. This website, which has the highest number of words in Marathi language, is visited by a few lakh people every month and learns the meaning of different words in different languages. It is mainly used by universities, colleges and media houses.
राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे धोरण ठरविल्यानंतर ते उत्तम प्रकारे राबविण्यासाठी भाषा संचालनालयाची स्थापना झाली. त्यानंतर मराठी भाषेचा राज्य कारभारात जास्तीत जास्त वापर व्हावा या साठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारच्या परिभाषा कोशांची निर्मिती केली. परंतु हे सारे परिभाषा कोश प्रिंट स्वरुपात असल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष वापर खुपच मर्यादित होता. यासाठी एकात्मिक वेबसाइट असणे ही काळाची गरज होती.
अनन्या मल्टिटेकने भाषा संचालनालयासाठी मराठी शब्दकोश या पोर्टलची रचना द्रुपाल मध्ये केली. सदर पोर्टलवर 39 शासकीय परिभाषा कोशांतर्गत साडे तीन लाखांहून अधिक मराठी शब्द व त्यांचे इंग्रजी आणि मराठी मधील समानार्थ उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील सर्वाधिक शब्दांचा भरणा असलेल्या या वेबसाइटला दरमहिन्याला काही लाख लोक सातत्याने भेट देतात व विविध भाषेत विविध शब्दांचे अर्थ जाणून घेतात. मुख्यत्वे करुन युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस व मिडीया हाउसेस हे याचे सर्वात जास्त वापर करतात.