Directorate of Languages (भाषा संचालनालय)

महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी राहील, असे धोरण शासनाने राबविले. त्यासाठी 6 जुलै 1960 मध्ये भाषा संचालनालयाची स्थापना झाली.अनन्या डेव्हलपरने https://directorate.marathi.gov.in/ ही वेबसाइट भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या मराठी भाषा संचालनालयासाठी बनवली आहे. या वेबसाइटमध्ये भाषा संचालनालयाविषयक माहिती नमुद केली आहे. मराठी भाषा विभागामध्ये होणाऱ्या परिक्षा, केंद्राचे व राज्याचे अधिनियम यांचा सामावेश आहे.

भाषा संचालनालयाची जी वेबसाइट आहे त्या वेबसाइटवर शासकीय परिक्षांबाबत निकालही पाहण्यास मिळतात. येथे मराठी शब्दकोश उपलब्ध आहे. त्याशिवाय भाषा संचालनालयाने घडवलेल्या मुख्य कोशांव्यतिरीक्त  ३० इतर परीभाषा कोशांचे एकत्रीत संकलन या वेबसाइटवर आहे. या वेबसाइटमध्ये भारताच्या संविधानाचा समावेशही आहे.