Hindi Vivek (हिंदी विवेक)

नाशिक मधल्या कालिदास सभागृहामध्ये 2 एप्रिल 2010 या रोजी राष्ट्रीय संघाचे सरसंचालक पू. मोहनजी भागवत यांनी ‘हिंदी विवेक’ हा प्रवेशांक सुरु करण्याची घोषणा केली. देशभरातील विचारक, लेखक अशा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिंसाठी हा प्रवेशांक सुरु करण्यात आला.

‘हिंदी विवेक’ या विशेषांकाची अनन्या डेव्हलपरने वेबसाइट बनवली आहे. https://hindivivek.org/ ही ‘हिंदी विवेक’ विशेषांकाची वेबसाइट आहे. ही द्रुपालच्या मदतीने बनवली आहे. ही वेबसाइट पूर्णपणे हिंदी या भाषेत आहे. या वेबसाइटमध्ये क्लायंटनी आपणास आवश्यक असे डेटासेट्स तयार केले आहेत. यामध्ये सामाजिक, राजकिय, महिलांविषयक, क्रिडा विषयक अशी बरीच माहिती नमुद केली आहे.

त्यात संपादन केलेले लेख समाविष्ट आहेत. त्याचबरोबर देशी विदेशी बातम्या, अद्यतने , पर्यावरणसंबंधी बातम्या या देखील समाविष्ट आहेत. ही सर्व माहिती सर्वसामान्य जनता ज्ञात करुन घेऊ शकते.  या वेबसाइटवर एक विशिष्ट प्रकारचे स्टोअर आहे, ज्यात काही विशेषांक आहेत. या विशेषांकांना ‘हिंदी विवेक’ या नावाने परिचित केले आहे. या वेबसाइटद्वारे ग्राहकांना ‘हिंदी विवेक’ शुल्क भरुन खरेदी करता येतात.