जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. इंग्रजी भाषा ही जरी सर्व जगाची व्यवहाराची प्रमुख भाषा असली तरी स्थानिक लोक त्यांच्या मातृभाषेतच व्यवहार करणे पसंत करतात. मराठी, हिंदी, उर्दू, तमिळ, गुजराती अशा स्थानिकांना भावणाऱ्या भाषेत असलेली माहिती अधिक प्रमाणार पाहिली व वापरली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था देखील आपले प्रॉडक्ट लोकांना उपलब्ध करताना शक्यतो स्थानिक भाषेत उपलब्ध करतात. तुमची वेबसाइट व मोबाइल ऍप जर स्थानिक भाषेत असेल तर त्याला मिळणारा प्रतिसाद अधिक चांगला असतो. पण स्थानिक भाषेत साइट बनवताना केवळ भाषांतर करून किंवा स्कॅन्स/पिडीएफ ऑनलाइन टाकून होत नाही. त्यासाठी युनिकोड वापरून विवीध SEO, Metatag चे निकष वापरून साइट स्थानिक भाषेत प्रसिद्ध करावी लागते. अनन्या मल्टीटेकमधे आमचे ह्या विषयावर प्रभुत्व आहे. महाराष्ट्र शासन, माहिती जनसंपर्क महासंचालनालय सारख्या शासनाच्या विभागापासून ते पुनश्च/बहुविध सारखे मराठीतील सशुल्क नियतकालीकांसारख्या प्रयोगांपर्यंत अनेकजण प्रोफेशनल सर्विसेससाठी आमच्यावर भरोसा ठेवतात.

मुख्यत्वे मराठी व हिंदी भाषांमधे आम्ही काही मोठ्या डेटा/न्यूजबेस असलेल्या साइट्स व मोबाइल ॲप्स तयार केले आहेत. या वेबसाइट्स आम्ही वर्डप्रेस व द्रुपालसारख्या प्रोफेशनल प्रणाली वापरून बनवतो. वर्डप्रेस व द्रुपाल ह्या दोन कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहेत. आम्ही बनविलेल्या ह्या वेबसाइट्स डायनॅमिक स्वरुपाच्या असतात. अशा वेबसाइट्स क्लायंट स्वतः हाताळून त्यात बदल करू शकतो. या वेबसाइट्सवर आपापल्या भाषांमध्ये लेख लिहीणे व तो वेळोवेळी अद्ययावत राखणे सहज शक्य होते.  मराठीमधील शब्दकोश व विश्वकोश हे दोन्ही मोठे पोर्टल आम्ही बनवले आहेत. शिवाय मराठी भाषा विभागाची साइट, भाषा संचालनालयची साइट, साहित्य संस्कृती मंडळाची साइट अशा अनेक मराठी साइट आम्ही बनवल्या आहेत. हिंदी विवेक ही विवेक समुहाची राष्ट्रीय प्रकाशनाची साइट आम्हीच वर्डप्रेस वापरून बनवली आहे.

आम्ही विविध भाषांमध्ये मोबाइल ॲप सुदधा बनवतो. काही मोबाइल ॲप गेम्स खेळणे, किंवा एखादी गोष्ट मोजणे, साठवणे ह्यासाठी असतात तर काही ऍप ऑनलाइन असलेली माहिती मिळवणे, ऍनलिसीस करणे ह्यासाठी असतात. दुसऱ्या प्रकारातील ऍपना “प्रोग्रेसिव्ह मोबाइल ऍप” असे म्हणतात. आम्ही मुख्यत्वे अशा प्रकारचे ऍप बनवतो. आणि ते स्थानिक भाषेत बनवू शकतो. उदा. विश्वकोशाच्या ऍपमधे प्रत्यक्ष काहीच माहिती नसते. वेळोवेळी विश्वकोशाचे ऍप लागेल ती माहिती साइटवरून मिळवते व दाखवते.

अशा प्रकारच्या स्थानिक भाषेतील साइट्स व ऍप बनवून तुम्हीदेखील तुमची उत्पादने व सर्विसेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आणू शकता व अधिकाधीक फायदा घेऊ शकता. आजच संपर्क करा.