Maharashtra Corona Information Portal

महाराष्ट्र कोरोना इन्फॉर्मेशन पोर्टल या पोर्टलवर सगळे क्लायंट एकत्र येऊन काम करतात. या पोर्टलची एक वेबसाइट अनन्या डेव्हलपरने तयार केली आहे. https://mahainfocorona.in ही वेबसाइट कोरोनासंबंधी आहे. ती द्रुपालच्या साहाय्याने बनवली गेली आहे. या वेबसाइटमध्ये कोरोनाची माहिती, बातम्या, अद्यतने या सगळ्यांचा सामावेश आहे. कोरोना हा विषाणू चीन मधल्या वुहान या क्षेत्रातून पसरण्यास सुरवात झाली. याला जागतिक संघटनेने कोविड 19 असे नाव दिले. या विषाणूचा प्रसार एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो.

या वेबसाइटमध्ये क्लायंट स्वतःचे डेटासेट्स तयार करुन सर्वसामान्य लोकांपर्यंत कोरोनाविषयक अधिक माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो. कोरोना विषाणू संबंधी कोणती काळजी घ्यावी हे देखील यात नमुद केले आहे. प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे त्या त्या जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयांची यादी यात आहे. त्याचबरोबर त्या रुग्णालयाचे नाव, दूरध्वनी क्र., ठिकाण अशी सविस्तर माहिती दिली गेली आहे. जिल्ह्यांतर्गातील उपलब्ध सुविधा, सरकारी अधिकाऱ्यांचे आदेश, मुख्यमंत्र्यांच्या घोषणा इत्यादी अद्यतने समाविष्ट आहेत. या वेबसाइटमध्ये क्लायंटद्वारे कोरोना संबंधी नवनवीन बातम्या, नियमावली, अद्यतने रोजच्या रोज नमुद केल्या जातात.