अनन्या मल्टिटेक मध्ये इतर सुविधांसोबत Online Shopping ही पण एक सुविधा आम्ही समाविष्ट केली आहे. Online Shopping च्या मदतीने ग्राहक घर बसल्या खरेदी करु शकतात. Online Shopping करताना विविध पर्यायांतून आपणास हवी असलेली वस्तू आपण निवडू शकतो. जसे ग्राहकांना हवी असणारी वस्तू ते निरखुन पारखुन बघतात तसेच ते ऑनलाइन तेथे असलेल्या पर्यायांद्वारे देखील पाहू शकतात आणि नंतरच ती वस्तू खरेदी करु शकतात. समजा वस्तू पाहून देखील खरेदी करायची नसेल तर ते ताबडतोब रददही करु शकतात. वस्तू पाहण्यास कोणत्याच प्रकारचा शुल्क भरावा लागत नाही. काही वेळा Online Shoppingकेल्यामुळे त्या वस्तूंवर एका विशिष्ट किंमतीची सूट देखील दिली जाते. ती सुट कधी रुपयांत तर कधी टक्केवारीत असते. ग्राहकांना Online Shopping चा असा फायदा होतो की त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. हाच वेळ आणि पैसा ते दुसरीकडे वापरु शकतात.

Online Shopping करताना ग्राहकांना स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशा पुरेशा माहितीची नोंद करावीच लागते. या नोंदीमुळे Online सेल असल्यास ग्राहकांना कळविले जाते. तसेच गणपती उत्सव, दिवाळी अशा मोठ्या सणांनिमित्त विविध प्रकारच्या ऑफर्स ग्राहकांपर्यंत पोचविल्या जातात. Online Shopping केलेल्या वस्तू आपणास कुरिअरच्या साहाय्याने घरपोच केल्या जातात. त्यासाठी कमीत कमी 5-6 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो. घरपोच केल्याबद्दल काही वस्तुंवर शुल्क आकारला जातो तर काहींवर नाही. Online Shopping करताना जे पेज समोर असते त्यामध्ये त्या वस्तूची पुर्ण माहिती नमुद केलेली असते. ती वस्तू कोणत्या कंपनीची, कोणत्या दर्जाची तसेच तिची किंमत, त्यावरील सुट, कोणकोणत्या रंगात सध्या उपलब्ध आहे, अशी सर्व माहिती असते. त्याबरोबरच असलेल्या किंमतीमध्ये सगळ्या प्रकारचे कर अगोदरच समाविष्ट केलेले असतात ती सर्व माहिती वाचल्यावरच वस्तू खरेदी करावी.

Online Shopping साठी देय देण्याच्या अनेक पद्धती येथे उपलबध केल्या गेल्या आहेत. उदा. Debit card, Credit card व वस्तू घरपोच झाल्यानंतर. ग्राहकांचे बॅंक खाते असल्यास Debit card किंवा Credit card च्या मदतीने ते लगेचच देय देऊ शकतात. अथवा नसल्यास वस्तू मिळाल्यानंतरही देय देता येते. याचा तोटा असा होतो की घेतलेली वस्तू न आवडल्यास परत करता येत नाही. म्हणूनच ग्राहकांनी आवडलेल्या वस्तूची माहिती नीट वाचूनच, पूर्णपणे विचार करुनच नंतर ती वस्तू खरेदी करावी.