You are currently viewing Raigad Community Portal

Vision Raigad.in‘ is a confluence of various topics such as culture, glory, personality, tourism and the revolutionary ‘Go Local’ directory of “Hon. Prime Minister Shri Narendraji Modi” of Raigad district. This web portal was created under the guidance of Dear Chief Minister of Maharashtra Shri. Devendraji Fadnavis and Hon. Guardian Minister Shri. Ravindraji Chavan. It’s not just a web portal, it’s an experiment in “social innovation”. The main premise of this is that the locals should upload various information about their area, culture and business by themselves and show the diversity and strengths of Raigad to the whole world.

Ananya MultiTech was entrusted with the task of creating such an up-to-date dynamic complex portal using Drupal technology. This portal has been created in just one month by making proper use of various technical facilities in Drupal. When looking at the information of any tourist destination on this portal, the information of the local traders and their products is automatically available. E.g. See the Korlai Fort page. It also contains information about the Korlai fort and its tourist attractions, as well as information on the Alibag traders.

रायगड जिल्ह्याचे संस्कृती वैभव, व्यक्तीवैभव, पर्यटन आणि “मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी” यांची क्रांतीकारी ‘गो लोकल’ डिरेक्टरी अशा विविध विषयांचा संगम म्हणजे ‘व्हिजन रायगड.इन‘. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व मा. पालकमंत्री श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून हे वेबपोर्टल साकारले. हे केवळ वेबपोर्टल नसून, “सोशल इनोव्हेशनचा” एक आगळा प्रयोग आहे. स्थानिक लोकांनी आपल्या परिसराबद्दलची, संस्कृती पासून ते व्यवसायाबाबतची विविध माहिती स्वतःच अपलोड करून रायगडच्या वैविध्याचे व बलस्थानांचे दर्शन संपूर्ण जगाला घडवावे असे याचे मुख्य सूत्र आहे.

द्रुपाल तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा प्रकारचे अद्ययावत डायनॅमिक गुंतागुंतीचे पोर्टल बनवण्याची जबाबदारी अनन्या मल्टिटेककडे देण्यात आली. द्रुपाल मधील विविध तांत्रिक सुविधांचा योग्य प्रकारे वापर करुन हे पोर्टल केवळ महिन्याभरात बनवले गेले आहे. सदर पोर्टलवर कुठल्याही पर्यटन स्थळाची  माहिती बघताना तेथील स्थानिक व्यावसायिकांची व त्यांच्या उत्पादनांची माहिती ऑटोमॅटिकली उपलब्ध होते. उदा. कोर्लाई किल्ल्याचे पेज पहा. यामध्ये कोर्लाई किल्ला व तेथील पर्यटन स्थळांविषयी माहिती पाहताना अलिबाग मधील व्यावसायिकांची माहिती देखील उपलब्ध होते.