RMVS (राज्य मराठी विकास संस्था)

१ मे १९९२ रोजी मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण व संगोपन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ‘राज्य मराठी विकास संस्था’ या संस्थेची स्थापना केली. ‘मराठीचा विकास महाराष्ट्राचा विकास’ हे या संस्थेचे बोधवाक्य आहे. विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक वाढत जावा यासाठी प्रयत्न करावे,  हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

अनन्या डेव्हलपरने या संस्थेसाठी https://rmvs.marathi.gov.in/ ही वेबसाइट तयार केली आहे. या संस्थेच्या स्थापनेनंतर मराठी भाषेत लिहिले गेलेले ग्रंथ, प्रकाशने या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोचवले जातात. या संस्थेत होणारे प्रकल्प, उपक्रम या वेबसाइट मध्ये नमुद केले आहेत. तसेच संस्थेविषयक काही माहिती यात उपलब्ध आहे. या वेबसाइटच्या मदतीने संस्थेशी थेट संपर्क साधून आपणास अपेक्षित असलेली माहिती संस्थेला वेळोवेळी कळवता येते.