SAATH Trust

साथ ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे थॅलॅसेमिआ या रोगापासून लहान मुलांचा बचाव करणे. थॅलॅसेमिआ हा रोग एक प्रकारे रक्ताचा विकार आहे. हा रोग अनुवंशिकतेमुळे पसरतो. SAATH म्हणजे SUPPORT AND AID FOR THALASSAEMIA HEALING,  म्हणजेच लहान मुलांना सहाय्य करून त्यांची काळजी घेणे व थॅलॅसेमिआ या रोगावर उपचार करुन त्यापासून त्यांना मुक्त करणे. साथ ट्रस्ट हे सुजाता रायकर यांनी स्थापन केले.

या ट्रस्टसाठी अनन्या डेव्हलपरने https://saathtrust.org/ ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटद्वारा या ट्रस्टबाबत सर्व माहिती मिळवता येते. तसेच या वेबसाइटमध्ये थॅलॅसेमिआ या रोगाची माहिती देखील नमुद केली आहे. ही वेबसाइट डायनॅमिक असल्याने क्लायंट स्वतः हाताळून विविध डेटासेट्स तयार करतात आणि वेळोवेळी आवश्यक माहितीनमुद करतात. हे सर्व द्रुपालमुळेच शक्य झाले आहे.